भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती प्रतिष्ठापना करून पूजन करण्याची परंपरा आहे.
विद्येची आराध्य देवता श्री गणेश. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. ही पूजा करीत असताना श्री गणेशाच्या रूपामागील तत्वज्ञान समजावून घ्यावे , तसेच संघटनेची देवता अशा अर्थानेही या देवतेच्या रूपाकडे पाहण्याचा प्रयत्न करावा असा नवा विचार समाजासमोर मांडण्याचा ज्ञान प्रबोधिनीचा प्रयत्न आहे. गणेशाची प्रतिष्ठापना करून, त्याचे सोळा उपचारांनी पूजन, सार्थ अथर्वशीर्ष पठण, गद्य प्रार्थना ,आरती असे या पूजेचे स्वरूप आहे. कुटुंबात तसेच सार्वजिनक गणेशोत्सव मंडळ अशा ठिकाणी ही पूजा करण्याची सोय उपलब्ध आहे.